ताज्या घडामोडी

युवकांनो अधिकारी बनण्याचे नियोजन करा – इंजि.नरेंद्र पलांदुरकर

ग्रामीण प्रतिनिधी : टिकेस्वर चेटुले दिघोरी

लाखनी– युवकांनी मोठी स्वप्न बघावीत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे .स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची मोठी संधी उपलब्ध आहे म्हणून अधिकारी होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणं आवश्यक आहे.असे मत इंजि.नरेंद्र पलांदुरकर यांनी मांडले ते गुरढा येथील कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघ गुरढा च्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सम्यक बुद्ध विहारात केले होते.टाईम बॉंडेड गोल सेटिंग सेमिनार अर्थात प्रशासकीय अधिकारी कसे व्हावे ?या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखणीचे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर ,मार्गदर्शक पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे तर मुख्य मार्गदर्शक इंजि.नरेंद्र पलांदुरकर होते.यावेळी विचारपीठावर डॉ. स्नेहा पलांदुरकर ,सारपंचा पुष्पाताई बावनथडे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती कुंभारे मॅडम ,पोलीस पाटील विलास मोहतुरे ,नितीन रणदिवे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाली.अध्यक्ष स्थानावरून बोलताना पात्रीकर म्हणाले जिद्द ,चिकाटी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश हमखास मिळतेच . अधिकारी होण्याचे स्वप्नच बघू नका तर ते साकार करण्यासाठी मेहनत करा.तर पो.नि. सिंगनजुडे म्हणाले मोठं यश गाठायचं असेल तर सुरवातीला छोटी छोटी ध्येय गाठायला सुरवात करा म्हणजे मोठं ध्येय सहज गाठता येईल.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा प्रथमच ग्रामीण भागात आयोजित करण्यात आली असल्याने छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेचे सर्वत्र कौतूक करण्यात आले कार्यक्रमाची सांगता अल्पपोहराने झाली. कार्यक्रमाचे संचालन उमेश सिंगनजुडे ,प्रस्ताविक किशोर मोहतुरे, आभार शरद वाढई यांनी मानले कार्यक्रमाच्या यशवितेसाठी विलास शेळके,सचिन चौधरी,प्रकाश कठाने,यशवंत कठाने,माणिकराव हुमे,होमराज मोहतुरे,धीरज कांबळे,सचिन डोमळे, चंद्रशेखर मोहतुरे,आकाश मोहतुरे,फागोजी मोहतुरे,राकेश कांबळे,मधू मोहतुरे,युवराज मोहतुरे,प्रभू हुमे,अनिल मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close