राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिपसाठी भिसीच्या विद्यार्थ्यांची दमदार निवड

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के
चंद्रपूर येथे पार पडलेल्या कराटे कुमिते निवड चाचणी स्पर्धेत शिवाजी पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, भिसी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम कामगिरी करत राज्यस्तरीय चॅम्पियनशिपसाठी चमकदार निवड मिळवली आहे. स्पर्धेचे आयोजन स्टेयर्स च्या जिल्हा प्रमुख लता बारापात्रे यांनी केले होते .
या स्पर्धेत नमन मिश्रा व आर्या पारधी यांनी उत्कृष्ट कौशल्य सादर करत गोल्ड मेडल पटकावले. तर स्मित तिखट यांनी प्रभावी झुंज देत सिल्वर मेडल मिळवले.
याचबरोबर कोमल लोहोकरे, संचिता नन्नावरे, मोहिनी घेंगारे आणि धर्मेश गौरकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन सादर करून ब्रॉन्झ मेडल मिळवले. सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिपसाठी निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डॉ. सुशांत इंदूरकर (प्रशिक्षक) यांनी अभिनंदन करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नितेश उघडे व इतर शिक्षकवृंद यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.









