अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडीतेने पोलिसात दाखल केली तक्रार
आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
बलात्कार झाल्याप्रकरनी गोंडपीपरी पोलीसात पीडितेने तक्रार दाखल केली.
लागलीच पोलीसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील
मौजा वटराना येथील अल्पवयीन मुलीवर खराळपेठ येथील 24 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना दि.16 जानेवारी रोज रविवारला घडली .
आठवडी बाजाराचा दिवस असल्याने अल्पवयीन मूलगी बाजारातून भाजीपाला खरेदि करून घरी परतत असताना खराळपेठ येथील 24 वर्षीय आरोपी अतुल गोविंदा तावाडे रा.खराळपेठ हा सोमनपली कडे जात असल्याचे सांगत तिला दुचाकीवर बसविले.
दुचाकीत पेट्रोल टाकण्याचा बहाणा करून शॉर्ट कट मार्ग आहे असे सांगत दुचाकी खराळपेठ येथील जंगलाकडे वळवली.
काही अंतरावर जंगलात गेल्यावर अल्पवयीन मुलीने आरडा-ओरड करण्यास सुरवात केली.
पण नराधमाने तिचा गळा दाबला
अन जंगला नेऊन बलात्कार केला.आणि जंगलातून दुचाकीने पसार झाला.अल्पवयीन मुलगी खरेदी केलेल्या भाजीपाल्याची पिशवी जंगलात टाकून जंगलातून धावत पडत गोंडपीपरी-खराळपेठ मुख्य मार्गावर आली.
गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.आरोपीवर 363,376,376 ab भादवी सह कलम 4,6,8,12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोंडपीपरी पोलिसांनी आज दि.17 जानेवारी रोज सोमवारला दिली.
या अगोदर सुद्धा आरोपीवर पोस्को अंतर्गत 376 दाखल असल्याची परिसरात चर्चा आहे.
पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू याच्या मार्गदर्शनात सुरू आहे.