अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी माजलगावात गृहमंत्र्यांना मुस्लिम बांधवांचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव तालुक्यातील सुर्डी नजीक येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी व त्या चिमुरडीला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांना माजलगावात मुस्लीम समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केली आहे.
गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई हे बीड जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता शिवसेना जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी दि.१७ जुलै रोजी रात्री १० वाजता प्रत्यक्ष भेटुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पुरूषोत्तम श्रीराम घाटुळ या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी व अन्याय झालेल्या चिमुरडीला शासनाने अर्थिक मदत ही करावी अशी मागणी माजलगावात प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे मुजम्मिल पटेल मोबिन खान पठाण , नासेर खाँ पठाण, माजी नगरसेवक खलिल पटेल , अँड शेख खलिल , सलीम काझी ,मौलाना इद्रीस बागवान , राजु खान ,रहिम शेख ,नईमोदीन इनामदार , फारूक सय्यद , दिलशाद शेख ,शेख शौकत यांनी केली आहे.