ताज्या घडामोडी

02 आक्टोंबर 2023 सोमवार रोजी श्रीकृष्ण गार्डन येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य मराठा एल्गार सभा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सकळ मराठा समाजाच्या उपस्थितीत बैठक संपन्न परभणी – सकळ मराठा समजाची सावली विश्रमागृह परभणी येथे बैठक संपन्न झाली जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, व मराठवाड्यातील मराठयांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले होते. यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी व कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निजामकालीन कागदपत्रे तपासण्यासाठी एक महिन्याची मुदत मागीतली होती. ही मुदत 14 आक्टोंबर रोजी संपत आहे. म्हणून पुढील दिशा काय असणार आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून येणाऱ्या 02 आक्टोंबर सोमवार रोजी परभणी येथे यांची श्रीकृष्ण गार्डन, वसमत रोड परभणी येथे दुपारी 02.00 वाजता भव्य एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुका व गावामध्ये जाऊन मराठा आरक्षण संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
या सभेला परभणी जिल्हयातून सकळ मराठा समाजाने मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकळ मराठा समाजाचे नितीन देशमुख, गजानन जोगदंड, किशोर रणेर, बालाजी मोहिते, सुभाष जावळे, विठ्ठल भुसारे, विठ्ठल तळेकर, शिवराज जोगदंड, बाळासाहेब रेंगे, रामेश्वर अवरगंड, अमोल अवकाळे, सुनिल देशमुख, गणेश घाडगे, कैलास पौळ, रमेशराव देशमुख, नितिन जाधव, अशोक उबाळे, नंदु पाटील, डॉ. पुष्कराज देशमुख, गुणाजी अवकाळे, बाबासाहेब बचाटे, कृष्णा शिंदे, अरविंद भरोसे, गजानन लव्हाळे, अरुण पवार, सुर्यकांत मोगल, स्वप्नील गरुड, शुभम गिराम, गोविंद इक्कर, आतिश गरड, अमोल कदम, यांच्यासह आदींनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close