ताज्या घडामोडी

नगरपरिषद पाथरी कडुन माझी वसुंधरा अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक १२/०८२०२२ रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय, पाथरी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन सकाळी ठीक ११ वाजता करण्यात आले होते.हि स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.५ वी ते १० वी आणि खुला गट,
५ वी ते १० वी गटात माध्यमिक विद्यालय देवनांदरा शाळेच्या मुलींनी बाजी मारली.प्रथम कु.अंजली अशोक मुसळे, व्दितीय कु.समिक्षा गणेश मुजमुले, तृतीय कु.अश्वीनी नवनाथ कोल्हे, उत्तेजनार्थ कु.आकांक्षा आवढाजी ढवळे, उत्तेजनार्थ कु.प्रिया राजेश मुजमुले तर खुल्या गटात प्रथम अभिषेक अनिलराव गायकवाड शांताबाई नखाते विद्यालय पाथरी, व्दितीय कु.नेहा उध्वराव भाले पाटिल, तृतीय कु.सानिका बळीराळ शिंदे शांताबाई नखाते विद्यालय पाथरी, उत्तेजनार्थ कु.श्रावणी गणपतराव कुलकर्णी, उत्तेजनार्थ कु.वैष्णवी लक्ष्मणराव मुंदडा शांताबाई नखाते विद्यालय पाथरी,
वरील यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी, कार्यालयीन अधीक्षक भाले बी.यु., संतोष हुले,घोवळे साहेब, तुकाराम शेळके, शिवराय नाईक, वानखेडे सर,पारसकर सर, संगीता ढगे, कांबळे मॅडम,रामु नखाते आदिनी अभिनंदन केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close