शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण उद्घाटन सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाचे उद्घाटन पूर्णा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. बालाजी कापसिकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलकळस केंद्राचे केंद्रप्रमुख मा. सिद्धार्थ मस्के होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटसाधन केंद्र पूर्णा येथील साधनव्यक्ती श्री व्यंकट रमण जाधव सुलभक महेश जाधव व ओम धूळ शेटे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शाळापूर्व तयारीचे मेळावे मार्च महिना अखेर द्यावेत असे आदेश शासनाने दिले होते त्याचाच एक भाग म्हणून केंद्रस्तरावर सदरील प्रशिक्षण पार पडले.
उद्घाटक म्हणून बोलताना गटशिक्षाधिकारी कापसिकर म्हणाले,” शाळांनी आता अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यास अधिकाधिक मुले जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आकर्षित होऊ शकतात”.
प्रमुख अतिथी व्यंकटरमण जाधव यांनी शाळा पूर्वतयारी संबंधित सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के म्हणाले,” जिल्हा परिषद शाळानीं सातत्याने गुणवत्तापूर्ण काम केले आहे तसेच गुणवत्तापूर्ण काम केल्यास आपल्या शाळांचा दर्जा टिकून राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे यांनी केले तर आभार व्यंकटराव जाधव यांनी मानले.