सफाई कामगारांना मिळाली पगारवाढ
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
दिनांक 12/11/2020 ला ठेकेदार पद्धतीने जे कामगार नगर परिषद भद्रावती मधे काम करत होते त्यांचे प्रश्न आम आदमी पार्टी भद्रावती चा वतीने सोडविण्यात आले व कामगारांना न्याय मिळवून देण्यात आला मागील कित्येक वर्षापासून सफाई कामगारांना तुटपुंज्या पगारावर
काम करावे लागत होते. त्या कामगारांनी पगारवाढ मीळवून देण्यासाठी आप कडे मदत मागीतली
ठेकेदाराने शासनाचे न्यूनतम मजूरी चे जे धोरण आहे ते पूर्ण केले पाहीजे अशी मागणी आदमी पार्टी नी CEO यांची भेट घेऊन लाऊन धरली व ती मान्य झाली तसे लेखी पञ ठेकेदारानी कामगारांना दिले. त्याची परतफेड म्हणून आज पंचशील वार्ड मधे राहुल नगर येथे स्वेच्छेने सर्व सफाई कामगारानी स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता… कार्यक्रमा मधे प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी पार्टी जे जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे , जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा संघटन मंत्री परमजितसिंग झगडे , जिल्हा मीडिया प्रभारी राजेश चेडगुलवार महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे तालुका प्रमुख सोनल पाटील तथा अनेक पदाधिकारी तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते… सर्व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले व जिथे सत्य तिथे आम आदमी पार्टी सदैव पाठीशी खंबीर पणे सगळ्यांन सोबत आहे असे सांगितले व आम आदमी पार्टीशी जुळण्याचे या प्रसंगी आवाहन केले.