वनविभागाची मोठी कारवाई सांबराची शिकार प्रकरणी ११ लोकांना घेतले ताब्यात
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
दिनांक.१७/०१/२०२२ सोमवार ला १०:३० च्या सुमारास शंकरपूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव व नवतळा येथे जंगल लागून असून या जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्या च्या साह्याने सांभराची शिकार केलेली होती हे मास गावात आणून विक्री करण्याचा बेत होता याबाबतची गोपनीय माहिती वनविभागाला मिळताच त्या माहितीनुसार नवतळा येथील शंकर मसराम यांच्या घरी धाड मारली असता सांबराची भाजी शिजत होती ती भाजी जप्त करून त्याला बोलते केले असता शिकार करणारे मुख्य आरोपी हे पिंपळगाव येथील असल्याने त्यांच्या घरी धाड मारली त्या धाळीत तीन किलो शिजविले मास, तीन किलो कचे मास, चामडे,डोके,पाय, सत्तुर, कुराड, विळा, आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत पिंपळगाव येथील अरविंद तुकाराम ननावरे, निखिल महादेव जीवतोडे, अवचित सुभाष बारेकर,राजू घुघुसकर ,रुपेश धारणे ,एकनाथ बारेकर ,सुरज हरी घरत , अभिषेक चंद्रभान नन्नावरे, तर नवतळा गावातील शंकर मसराम, राजू वाढई ,रामू राजेराम कुमरे यांना ताब्यात घेतले असून वन विभागाची कारवाईची सुरू आहे.वृत्त लिहेपर्यंत ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र अधिकारी यु.बी.लोखंडे, वनरक्षक नैताम, वनरक्षक सोनुले प्रदीप ढोणे व आदी तपास करीत आहे.