साईबाबा जन्मस्थान पाथरी मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परमपूज्य साईबाबांना दीप प्रज्वलित करण्याची आवड होती ते द्वारका माईत दिवे लावत असत एकदा दिवाळीच्या वेळेस गावातील कोणीही बाबांना दिवे लावण्याकरता तेल दिले नाही. बाबांनी पणत्यात तेल ओतून पाण्याचे दिवे लावले. या प्रसंगातून भक्तांच्या असे लक्षात आले, की साईबाबा ही कोणीतरी महान विभूती आहे.
गेल्या पंचवीस वर्षा पूर्वी कै. रामराव कोक्कर यांनी साईबाबा जन्मस्थान मंदिरात दीपोत्सवाची सुरुवात केली त्यांचे पश्चात तीच परंपरा त्यांच्या सुविद्य पत्नी व दोन सुपुत्र श्री रवी भैय्या व रोहित भैय्या यांनी अखंडचालू ठेवलेली आहे. त्यांनी मंदिर, द्वारकामाई, वि.बा.खेर सभागृह व परिसरात नेत्र दीपक दीप प्रज्वलन, सुशोभित व कलात्मक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यावर्षी दीपोत्सवाचे व पाडव्याचे निमित्ताने साई भक्तांची पाथरी साईबाबा जन्मस्थान मंदिरात खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
भक्तांच्या गर्दीचे नियंत्रण स्वतः जातीने एडवोकेट अतुल दिनकरराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी कुशलतेने केले. दीपोत्सव आनंदात व उत्साहात साजरा झाला.