ताज्या घडामोडी

वनसंपदा अधिक समृद्ध करणे काळाची गरज

आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली- वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे असे संत तुकारामांनी शिव कालीन काळात सांगुन वृक्षाचे मानवी जीवनात महत्व विशद केले होते.माञ मानवी जीवनात अत्यंत मौलिक भुमिका बजावणा-या वृक्षांची किंमत मानवालाच कळली नसल्याने जंगलांचे अस्तित्व आलिकडे धोक्यात येऊ लागले आहे. दरम्यान कोरोना कालावधीत गंभीर रुग्णांना ऑक्सिजनच्या गरजेने परत वृक्षाचे महत्व नैसर्गिकरीत्या मानवापुढेच ठेवल्याने आपली नैतिक जबाबदारी समजुन वन संपदा अधिक समृद्ध करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.वडसा वन विभाग वतीने राष्ट्रिय वन हुतात्मा दिना निमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल होते तर प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शालु दंडवते, उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, पञकार पुरुषोत्तम भागडकर, किशोर मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आमदार गजबे पुढे म्हणाले की,संपुर्ण महाराष्ट्रातील वन संपदे पैकी सर्वाधिक वन संपदा गडचिरोली जिल्ह्यात असली तरी अलिकडे वारेमाप होऊ लागलेली जंगलतोड थांबविणे गरजेचे आहे.कोरोना काळात अंदाजे दोन कोटी रुपये शासनाला ऑक्सिजनसाठी खर्च करावे लागल्याचे धक्कादायक वास्तव आहे. निसर्गाने भरभरुन दिले असले तरी त्याची किंमत कळली नसल्यानेच त्याचे परिणाम सद्या स्थितीत भोगावे लागत आहेत.अशी स्थिती भावी पिढीला सोसावी लागु नये याकरिता वेळेत नियोजन करणे गरजेचे असुन प्रत्येक नागरीकाने किमान एक तरी झाड लावुन त्याचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून वन कर्मचा-यांना पोलिसांप्रमाणेच कर्तव्य पार पाडावे लागत असले तरी शहिद वन कर्मचा-यांना पोलिसांप्रमाणेच शासकीय स्तरावरुन लाभ देण्यात येत नाही,याकडे आमदारांचे लक्ष वेधण्यात आले असता प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही तसेच शहिदस्तंभ उभारण्यासाठी तत्काळ पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी आमदार गजबे यांनी दिली.तसेच वन विभागाच्या सभागृहात आयोजीत रक्तदान शिबिरात एकुण १५ वन कर्मचा-यांनी रक्तदान करून शहिद वन कर्मचा-यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचालन वनाधिकारी रमेश घुटके, प्रास्ताविक सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण तर आभार प्रदर्शन भूषण खंडाते यांनी केले.कार्यक्रमाला वडसा वन विभागाचे वनाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close