ताज्या घडामोडी

शिवशंकर यात्रा महोत्सवानिमित्त मौजे खेर्डा महादेव येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शिवशंकर यात्रा महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 06 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2022 च्या दरम्यान खेर्डा महादेव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री अभिजीतराव आम्ले यांच्या मार्गदर्शनात बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी ग्रंथ पूजा करून प्रारंभ झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, पंचमवेद संत तुकाराम गाथा व शिवमहापूराण ग्रंथाची ढोल ताशा टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, नंतर ग्रंथांची महापूजा करण्यात आली त्यानंतर श्री ह भ प शरद महाराज आम्ले यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वरी पारायण पार पडले, सकाळी 10 ते 12 या वेळेत गाथा भजन श्री ह भ प बद्रीनाथ महाराज तौर यांच्या मार्गदर्शनात झाले, दुपारी दोन ते पाच या वेळेत शिवमहापुराण कथा श्री ह भ प अंगद महाराज डाके यांच्या सुश्राव्य वाणीतून झाली त्यांना साथ संगत श्री ह भ प सदाशिव महाराज बादाडे, श्री ह भ प बळीराम महाराज शिंदे व मृदंग महामेरू पार्थपूर रत्न श्री ह भ प सुरेश महाराज पाथरीकर यांनी केली. शिवमहापुरान कथा संपल्यानंतर महाप्रसाद झाला. सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ, रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकीर्तन झाले. या आठ दिवसीय किर्तन मालेतील पहिले कीर्तन पुष्प श्री ह भ प गणेश महाराज लोंढे यांनी गुंफले.
या कार्यक्रमात दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत काकडा भजन, सकाळी 6 ते 7 पर्यंत विष्णुसहस्त्रनाम, सकाळी 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 1 ते 5 श्री ह भ प अंगद महाराज डाके यांच्या मंगल वाणीतून शिवमहापुराण कथा, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन आणि जागर होईल. आज शुक्रवार दिनांक 8 एप्रिल 2022 शिव महापुराण कथा संपल्यानंतर श्री अनंत नारायणराव आम्ले यांनी सपत्नीक महाआरती केली व नंतर श्री नारायणराव चिमाजी आम्ले यांच्यावतीने महाप्रसाद झाला.
सदर कार्यक्रमात मुख्यत्वेकरून
दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी श्री ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद, तसेच शिवशंकर यात्रेनिमित्त दुपारी तीन ते पाच या वेळेत नवसाच्या गाड्या ओढणीचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ ते एक या वेळेत गावातून श्री शिव शंकराची भव्य पालखी मिरवणूक ढोल ताशा टाळ-मृदंगाच्या गजरात निघेल पालखी मिरवणूक हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यानंतर रात्री 1 पहाटे 4 वाजेपर्यंत संगीत भारुडाचा कार्यक्रम होईल.
दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी अकरा ते दुपारी 3 वाजेपर्यंत जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होईल.
सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी समस्त गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
अशी माहिती श्री प्रताप आम्ले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close