चिमूर-नागभीड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी ने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘हेल्थ ऑडिट’.

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
सध्यस्थितीत चिमूर व नागभीड तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जनमानसात संभ्रमतेचे वातावरण दिसत आहे. बदलत्या मौसमामुळे ताप-सर्दी यासारखे आजार वाढत असतांना कोरोनासारखेच लक्षण दिसत असल्यामुळे नेमके काय करायचे असा प्रश्न जनमानसात दिसून येत आहे. भीतीपोटी किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना चाचणी करण्याकडे लोकांचा कल कमी होत आहे असे दिसून येते. रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यास आरोग्य व्यवस्थेची नेमकी तयारी किती व कशी आहे हे जाणून घेण्याकरिता चिमूर व नागभीड तालुक्यात आम आदमी पार्टी चे चंद्रपूर जिल्हाप्रमुख श्री सुनीलजी मुसळे यांच्या मार्गदर्शनात विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात आरोग्य व्यवस्थेचे ‘हेल्थ ऑडिट’ करण्यात आले.
बदलत्या मौसमामुळे नेहमीसारखे साधारण ताप-सर्दी चे आजार वाढत असून कोरोनाचे लक्षण सारखेच असल्यामुळे जनमानसात संभ्रम दिसून येत आहे. भीतीपोटी लोक कोरोना चाचणी करण्यास दुर्लक्ष करत असतांना आढळले, अश्या मानसिकतेमुळे रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. चिमूर व नागभीड तालुक्यातील कोविड सेंटर ला भेट देवून कोविड विषयी तयारीचे ‘हेल्थ ऑडिट’ करण्यात आले. या ‘हेल्थ ऑडिट’ दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मागील एक आठवडया मध्ये चिमूर तालुक्यात सरासरी दररोज सहा रुग्ण तर नागभीड तालुक्यात सरासरी दररोज दोन रुग्ण आढळून आले आहेत. चिमूर येथील कोविड सेंटर मध्ये एकाच वेळी साठ रुग्णांची व नागभीड मध्ये अंशी रुग्णांची व्यवस्था होईल अश्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. ऑक्सीजन ची कमतरता जाणवणार नाही अशी व्यवस्था केल्याची आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले. क्रिटीकल रुग्णांसाठी अध्यवत रुग्णवाहिकेची सोय असल्याचे ‘हेल्थ ऑडिट’ मध्ये समजून आले. येणाऱ्या परिस्थितीला सांभाळण्यास सक्षम असल्याचे आरोग्य अधिकारयांकडून सांगण्यात आले.
आम आदमी पार्टी तर्फे घेण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या ‘हेल्थ ऑडिट’ च्या यशस्वीतेसाठी आप चे चिमूर तालुका अध्यक्ष आदित्य पिसे, सचिव विशाल इंदोरकर, मंगेश शेंडे, कैलाश भोयर, नागभीड तालुका प्रमुख संतोष इखार, विलास दिघोरे, निरंजन बोरकर, समिधा भैंसारे, ज्योती बावनकर, वंदना घोनमोडे व इतर स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले.









