निवडणुकीच्या प्रचारानिमित्त अनेक तालुक्यात प्रचारसभा
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
येत्या नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारानिमित्त #गडचिरोली जिल्ह्यातील #मूलचेरा, #भामरागड, #एटापल्ली आणि #अहेरी तालुक्यात आज प्रचारसभा घेऊन स्थानिक उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदार बंधू भगिनींसह दृढ संकल्प केला
गडचिरोली जिल्ह्यातील ही पंचायत समिती निवडणूक #शिवसेना आणि #राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष एकत्रितपणे लढवत आहेत….
उपस्थित मतदारांना संबोधित करताना गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचे नमूद करित या जिल्ह्याची मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. #मुंबई – #नागपूर या शहरांना जोडणारा #बाळासाहेबठाकरेसमृद्धी_महामार्ग पुढे #भंडारा, #गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत जोडण्यात येणार असून त्याद्वारे हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे यासमयी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, वीज पुरवठा, मोबाईल सेवा या सगळ्याच बाबतीत अनेक सुधारणा करत असून त्याद्वारे येत्या काही वर्षांत गडचिरोलीचा चेहरामोहरा पुरता बदलून जाणार आहे. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून येथील स्थानिक तरुणांना येथेच उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याचे नमूद करताना गाव पातळीवर विविध विकासकामे करण्यासाठी भविष्यात निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी नगर पंचायत निवडणूक संदर्भात एटापल्ली व मूलचेरा या ठिकाण च्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उमेदवार व प्रमुख पदधिकारी बैठक आज इंडियन पॅलेस अहेरी या ठिकाणी झाली. प्रमुख उपस्थित नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, माजी राज्यमंत्री तथा आमदार आदरणीय राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविन्द्रजी वासेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव, शिवसेना नेते किशोर पोतदार, जिल्हा परिषद बांधकाम सभापती युद्धिष्टिर बिश्वास,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष शाहीन भाभी हकीम, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपलीवार, अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख रियाज शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, , पंकज फुलबांदे, जयकुमार भैसारे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा व विकासाला मत देण्याचे आवाहन धर्मराव बाबा आत्राम यांनी केले व मुलचेरा व एटापल्ली नगरपंचायत मध्ये आघाडीला एकहाती सत्ता घ्या याप्रसंगी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.