ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवभोजन केंद्राला आमदारांची सदिच्छा भेट

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने गोर, गरीब गरजवंतासाठी चालविण्यात येत असलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकरी उपहारगृहात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्राला तुमसर व मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी सदिच्छा भेट देऊन स्वादिष्ट शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला तसेच दैनंदिन वितरण करण्यात येणाऱ्या १०० थाळ्या कमी पडत असून थाळ्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव अनिल भोयर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे, शिवभोजन केंद्र चालक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, समितीचे संचालक शेखर सेलोकर, निशांत बोरकर, लक्ष्मीकांत कोकोडे, मुकुल मेश्राम, सुरेश बोन्द्रे, शिवभोजन केंद्रातील अरुण डांगरे, प्रकाश भोयर, श्रीराम पटले सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close