ताज्या घडामोडी

राम नाम जीवनासाठी तर कोरोणा डोस शरीरासाठी महत्वाचा – ह भ प रोहिदास महाराज मस्के

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राम नाम जीवनाला समृद्ध करते तर कोरोणाचा डोस शरीराला सुदृढ बनवतो. त्यासाठी रामनामाचा डोस इतकाच कोरोणाचा डोसही महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन हभप रोहीदास मस्के महाराज यांनी वागलगाव येथील कीर्तनात शुक्रवारी बोलताना व्यक्त केलं.


वाघलगाव येथे शुक्रवारी विठ्ठलराव घनवटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत मोतीराम महाराज शाळेचे संचालक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, अशोक महाराज ,माजी सरपंच जयदेव मिसे , नारायण डोणे , शिवाजी महाराज बोबडे, भानुदास महाराज आवलगावकर, परिसरातील मंडळी उपस्थित होती .पुढे बोलताना मस्के महाराज म्हणाले की, आपल्या वाडवडिलांच्या नावाने दानधर्म करन महत्त्वाचा आहे. त्यात ज्ञानदान नामदान, अन्नदान हे कार्यक्रम आज होत आहे. मुलांच्या वागण्यावरून त्यांच्या वडिलांचा समाजातील स्थान ठरत असतं. आपल्या वडीलधाऱ्यांचा समाजातलं स्थान सर्वोच्च राहावे यासाठी मुलांनी आपले आचरण चांगले ठेवण्याची गरज असल्याचे महाराजांनी सांगितले. कोरणा सारख्या महामारी संकटातून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणे सोबतच कोरोणाचे डोसही वेळेवर घेणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close