ताज्या घडामोडी

पाथरी बाजार समीतीच्या सभापतीपदी अनिल नखाते कायम

विभागीय सह निबंधकांनी जिल्हा उपनिबंधकाचे आदेश केले रद्द.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या जुन्या प्रकरणात नखाते यांचे संचालक पद रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांनी काढलेला १४ ऑक्टोबर २०२४ चा आदेश छत्रपती संभाजी नगरचे विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी रद्द केला आहे. त्यामुळे अनिल नखाते याची सभापतीपदी वर्णी कायम राहीली आहे.
संचालक एकनाथ घांडगे व ईतर ४ जणांच्या जुन्या तक्रारीनुसार अनिल नखाते यांना महाराष्ट्र बाजार समितीच्या नियम २०१७ मधील नियम १० (१) नुसार संचालकपदी १० आँक्टोबर २०२४ रोजी अपात्र घोषित केले या निर्णयाविरुद्ध अनिल नखाते यांनी १६ आँक्टोबर रोजी विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केले आहे.यामध्ये १८ आँक्टोबर रोजीच्या सुनावणीत हस्तक्षेपक म्हणून अमोल बांगड व शाम धर्मे यांनी अर्ज दिला याप्रकरणात प्रतिवादीची संख्या १० अशी झाली.या प्रकरणात ५ वेळा सुनावणी घेण्यात आली. यामध्ये अनिल नखाते यांच्या वतीने अँड.जि.व्ही.सुकाळे यांनी केलेल्या युक्तीवादात अनिल नखाते यांना सभापती पदावरून हटविण्यासाठी केवळ राजकीय हेतून केलेल्या तक्रारी अनुषंगाने आव्हानीत आदेश हे चुकीचे आहेत. कारण प्रस्तुत प्रकरणात नखाते यांना नैसर्गिक न्यायतत्वानुसार सुनावणीची संधी देण्यात आलेली नाही.नखाते यांच्या अपात्रतेसाठी हेतुपुरस्सर कंपनीचा संबध लावला गेला आहे. तसेच नखाते यांना देण्यात आलेल्या दि. २८.०५.२०२४ रोजीच्या नोटीसमध्ये उत्तर देण्यासाठी कोणतेही आरोप नमूद करण्यात आलेले नाही.प्रकरण ३१ जुलै रोजी निकालासाठी बंद केले असतांनाही १ आँगष्ट रोजी सचिव यांचा स्वतंत्र अहवाल कसा घेतला.या सर्व बाबी विचारात घेता नखाते यांचे संचालक पद रद्द करण्याचा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी दि. १४.१०.२०२४ रोजीचे आव्हानित आदेश रद्द करण्यात यावे असे मत मांडले.या प्रकरणात प्रतिवादी यांचे वतीनेही अँड.एम.आर.चौधरी,अँड.के.जे. सुर्यवंशी, अँड.मनिष त्रिपाठी यांनी युक्तिवाद केला.दोन्ही बाजुचा युक्तिवाद ग्राह्यधरुन छत्रपती संभाजी नगरचे विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी ३१ डिसेंबर रोजी अनिल नखाते यांना संचालक म्हणून अपात्र ठरविणारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांचा १४ ऑक्टोबर २०२४ चा आदेश रद्द केला आहे.तसेच हे प्रकरण फेरनिर्णयार्थ प्रतिप्रेषीत’ करण्यात आले आहे असे आदेशीत केले.या निर्णयामुळे अनिल नखाते यांचे सभापतीपद कायम राहीले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close