वनविकास महामंडळात मिश्ररोपवने द्या
पर्यावरण संवर्धन समीती .चिमुर चे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व मानव वन्यजिव संघर्ष कमी करण्यासाठी जंगलातील मिश्र रोपवन महत्वाची जबाबदारी पार पाडीत असते.अशातच वनविकास महामंडळात जास्तीत जास्त सागवानाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे सागवानाच्या झाडाखाली गवताचे प्रमाण अतिशय कमी असते.त्यामुळे गवत खाणारे वन्य प्राणी क्वचितच आढळतात.चितळ , रानगाय,सांबर, निलगाय, हरीण ,ससा आदी प्राणी यांना अन्न मिळत नसल्याने क्वचितच पाहायला मिळतात.या प्राण्यांना खाणारे वाघ , बिबट वनविकास महामंडळाच्या जंगलात कमी पाहायला मिळतात.त्यामुळे हे प्राणी जास्तीत जास्त बफर झोन , कोअर झोन , प्रादेशिक वनविभागात पाहायला मिळतात.कारण त्यांची अन्नसाखळी याच भागात पुर्ण होत असल्याने वनविकास महामंडळात कमी आढळत असल्याने जंगलातील प्राण्यांच्या अधिवास कमी होऊन मानव व वन्यजिव संघर्ष वाढला आहे.
वनविकास महामंडळाने 50%क्षेत्रात सागवान व 50% क्षेत्रात मिऋ रोपवन झाडे व फळ झाडे लावण्यात यावी.जेणेकरुण सर्व प्राणी यांची अन्नसाखळी बरोबर चालेल यासाठी पर्यावरण संवर्धन समीती चिमुर कडुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी चिमुर मार्फत निवेदन देण्यात आले .यावेळी पर्यावरन संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर,मोहन सातपैसे, राहुल गहुकर,मदन शिवरकर ,रवि मोहिणकर ,वृषभ उपरकार , मुन्ना शेख , सुहास तुराणकर,शंभरकर आदी उपस्थित होते.