पाथरी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी, दि. 1 मे 2024 रोजी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे सर यांच्या नेतृत्वाखाली , मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे, मराठवाडा संघटक मा.अहमद अन्सारी सर , जिल्हा सचिव मा.शेख ईफतेखार बेलदार सर ,मा. रईस कुरेशी सर व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनाच्या निमित्ताने पाथरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मा.श्री.बालाजी मोहिते यांना पुष्पगुच्छ देऊन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा. श्रीमती रेखाताई मनेरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन
सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या आणि समितीचे कार्य,उदिष्ट ध्येय.धोरण.या विषयी सखोल चर्चा करण्यात आली आणि पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मा.बालाजी मोहीते यांनी समितीचे कौतुक केले व आभार मानले
यावेळी पोलीस कर्मचारी मा अशोक.धस बिट जमादार मा.बालाजी लटपटे सर ,मा.जमदाडे सर , मां.कांगणे सर प्रिती दुधवडे मॅडम महिला पोलीस कर्मचारी वंदना निरस मॅडम महिला पोलीस कर्मचारी, व इतर सर्व पोलीस कर्मचारी,पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण करून अभिवादन केले