पोलिस स्टेशन शेगाव( बु )येथे गरबा डांडीया उत्सव साजरा
उत्कृष्ट मस्कऱ्या गणेश मंडळ यांना बक्षीस वितरण.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
शेगाव बु येथे दिनाक 2 ऑक्टोबरला लाल बहादुर शास्त्री व गांधी जयंती तसेच जागतिक शांतता दिवसाचे औचित्य साधून शांतता कमेटी आणि पोलिस स्टेशन शेगाव बू यांच्या सयुक्त विद्दमाने नवरात्र उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. हा उत्सव शेगाव बु मधे पहिल्यानदाच होत असल्याने महिला मधे उत्साह दिसत होता व या गरबा डांडिया उत्सवात शेगाव बु येथील 23 दुर्गा महिला मंडळाच्या टीम नी सहभाग घेऊन डांस करून आपला आंनद व्यक्त केला. तसेच ग्रामिण भागातील महिलानी गरबा डान्स करून शेगाव बु येथील जनतेचा आंनद दिगुणीत् केला व गावातील लोकांनी पण कार्यक्रमाला मोठ्या संखेनी
उपस्थित राहून अभुतपूर्व प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशसवीं रित्या पार करण्यकरिता शांतता कमेटी सदस्य नी आणि पोलीस स्टेशन शेगाव बु येथील कर्मचारी यांनी खूप मेहनत घेउन् कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमा सोबतच या वर्षी झालेल्या मस्कऱ्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील जे गणपती मंडळ यांनी चांगले डेकोरेशन आणि शांततेत मिरवणूक काढून शांतता कमिटी याना सहकार्य केले अश्या गणपती मंडळ याना बक्षिस वितरण शेगाव बु पोलीस स्टेशनचे ठाणेदार Api मेश्राम सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये ज्या गणपती मंडळ ने आपले गणपती मंडळ सुरुवातीला काढून शांतता कमिटी याना मदत केली असे
ओम साई मास्कऱ्या गणेश मंडल याना पाहिले बक्षीस देण्यात आले.
दुसरे बक्षिस
न्यू शक्ति मास्कऱ्या गणेश मंडल कुंभार मोहल्ला आणि
तृतीय बक्षिस
श्री मास्कऱ्या गणेश मंडल याना देण्यात आले.
डांडिया गरबा उत्सवात सहभागी सर्व स्पर्धकांना खूप सुंदर परफॉर्म केल्याने सर्व दुर्गा देवी मंडळ ला प्रोसाहन बक्षिसे शांतता कमेटी आणि व्यापारी संघटना यांनी देऊन स्पर्धकांचा आनद द्विगुणित केला. महिला याना पूर्ण वर्ष भर राब राबा लागते. दांडिया-गरभा स्पर्धा घेण्याचे मुख्य हेतू हा होता की दुर्गा देवी चा उत्सव हा नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे आणि महिलांना या नऊ दिवसामध्ये त्यांचे मनोरंजन झाले पाहिजे.
आधी मस्कर्या गणपती विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी शांतता कमिटी शेगाव बू यांनी खूप मोलाचे सहकार्य केल्याने आणि दांडिया – गरभा कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन केल्याने सपोनी मेश्राम ठाणेदार शेगाव बू पोलिस स्टेशन यांनी सर्व शांतता कमिटी शेगाव बू यांचे खूप खूप आभार मानले. या कायक्रमाचे अध्यक्ष शेगाव बु पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि मेश्राम सर तर प्रमुख अथिति पोउपनि जाधव सर होते.
कायक्रमाचे प्रस्ताविक पेटकर सर आणि संचालन सौ सुकेशनी माकोडे यानी केले व आभार प्रदर्शन सुधीर चिकटे सरानी केले.