चंद्रपूरकरांना सुदृढ आयुष्य दे अशी प्रार्थना करीत आ. किशोर जोरगेवारांनी घेतले कुटुंबासह माता महाकालीचे दर्शन
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर शहरातील माता महाकाली यात्रेला काल सोमवार पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. दरम्यान आज मंगळवारला येथील विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या कुटुंबासह माता महाकालीचे दर्शन घेतले . यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर व चंद्रपूरकरांना सुदृढ आरोग्य दे अशी प्रार्थना देखिल त्यांनी या वेळी केली. दर्शनासाठी मंदिरात कल्याणी किशोर जोरगेवार, प्रसाद किशोर जोरगेवार, रंजिता जोरगेवार, व माता महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनिल महाकाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. चंद्रपूरात
चैत्र महिण्यात भरणा-या माता महाकाली यात्रेला काल पासून आरंभ झाला असून जिल्ह्यासह अन्य ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल झाले आहे.तदवतचं दर्शनासाठी व यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची योग्य व उत्तम व्यवस्था करण्याच्या सुचना आमदार जोरगेवार यांनी या पूर्वीच प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबतीत त्यांनी प्रशासन व माता महाकाली भक्तांची एक बैठक घेत येथील उपययोजनांची माहिती जाणून घेतली होती. तेव्हाच त्यांनी काही आवश्यक सुचनाही प्रशासनाला केल्या होत्या.
आज चद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी आपल्या कुटुंबासह माता
महाकालीचे दर्शन घेतले. यात्रेसाठी आलेल्या भाविकांची आमदार जोरगेवार यांनी भेट घेत येथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. याच दरम्यान त्यांनी माता महाकालीची पूजा अर्चना करीत त्यांनी चंद्रपूरकरांना सुदृढ आरोग्य दे !अशी प्रार्थना केली.