हादगाव,कासापुरी मंडळात अतिवृष्टी
ढगफुटी सदृष्य पाऊस पिके पाण्या खाली;घरातही घुसले पाणी.
जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील हादगाव,कासापुरी मंडळात बुधवारी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजे पर्यंत जोरदार पाऊस बरसला यात हातगाव मंडळात १३०.८ मी मी तर कासापुरी मंडळात १०६.८ मी मी पाऊस झाल्याने शेतातील खरीपाची पिके पाण्या खाली गेली तर हातगाव बु मध्ये घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात मागिल काही दिवसा पासुन मोठा खंड पडला होता.गत आठवड्यात रिमझिम पाऊस झाल्या नंतर बुधवारी पहाटे तालुक्यातील पाथरी,हादगाव,बाभळगाव,कासापुरी या चारही महसुल मंडळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पहाटे तीन ते सकाळी नऊ च्या दरम्यान हादगाव मंडळात तुफाण पाणी बरसले यात एकट्या हादगाव मंडळात १३०.८ एवढा ढगफुटी सद्रष्य पाऊस झाल्याने ओढे नाले मर्यादा सोडून वाहात होते. तर शेतां ना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. यात सोयाबी आणि कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून जमिनी खरडल्या आहेत. तर हातगाव बु. मधील अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याचे या ठिकाणचे नागरीक पप्पू नखाते यांनी सांगितले. झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पप्पू नखाते आणि ग्रामस्थांनी केली आहे. असाच काहीसा प्रकार कासापुरी महसुल मंडळात झाला असून या ठिकाणी १०६.८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर बाभळगाव मंडळात ६२.३ तर पाथरी मंडळात ५५ मीमी पावसाची नोंद सरकारी दफ्तरात झाली असून सरासरी ८८.७ मीमी पाऊस जो की अतिवृष्टी मानला जातो एवढा पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.