ताज्या घडामोडी

नागभीड शहरामधील शिवटेकडी येथे लागली आग

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

नागभीड शहरामधील शिव टेकडी इथे दि.१९-०१-२०२१ रोज मंगळवार ला दुपारच्या सुमारास आग लागली, हा वनवा झेप निसर्गमित्र संस्थेच्या सदस्यांनी व वन विभाग नागभीड यांनी रात्रौ ७.३० पासून १२.१५ वाजेपर्यंत जीव धोक्यात घालून आगीच्या ज्वाला झाडाच्या फांद्यांद्वारे आग विझवली,
नागभीड शहरामध्ये असलेली शिव टेकडी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली आणि ते तेव्हाच विझवण्यात आली परंतु ती पूर्णपणे आटोक्यात आली नाही त्यामुळे त्यातील काही प्रमाणात विस्तव असल्या कारणाने ती रात्रौ ला ७.३० च्या सुमारास पुन्हा खुप मोठ्या वनव्यात रूपांतर झाली.नागभीड शहरातूंच वनव्याचे लोढे दिसत होते. ही माहिती झेप निसगमित्र संस्था नागभीड व वन विभाग यांना माहिती होताच त्यांनी आगीकडे धाव घेतली. ही आग जवळ जवळ टेकडी च्या पायथ्याशी असलेलं निसर्गयान याच्या त्याबाजुनी चालु होऊन टेकडी च्या वरच्या भागाला वायरलेस च्या पालिकडे होता हा वणवा सुमारे २ ते 3 की.मी पसरला होता याला विझवण्यासाठी सर्वांनी धाव घेतली, नागभीड वन विभागाचे वनरक्षक वघारे साहेब व वनरक्षक चिकराम साहेब यांच्या व झेप निसर्गमित्र चे अध्यक्ष डॉ.पवन नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली झेप निसर्गमित्र संस्था च्या सदस्य जितेंद्र शामकुळे. क्षितिज गरमाळे, करण मुलमुले.प्रीतम रगडे.मंगेश कुंभारे.मिलिंद ठाकरे.महेंद्र तिवस्कर मयुर मुटकुरे. अमन चोपडे.
अखिल समर्थ.वृशिकेश गरमळे आणि वन मजूर यांनी निंबाच्या फांद्या आणि जास्त पान असलेल्या झंडांच्या फांद्या तोडून माती टाकून त्या द्वारे सदरील संपूर्ण वणवा विझवला,,
अग्निशमन बंब आले परंतु पोहचू शकले नाही,,
नगपरिषद नागभीड चे अग्निशमन बंब आले परंतु ते जंगलात येऊ शकले नाहीं कारण वनवा जंगलाच्या मध्यभागी आणि वरच्या बाजूला होता त्यामुळे अग्निशमन बंब तिथं पर्यंत पोहचू शकणे अश्यक्य होते, त्यामुळे झेप निसर्गमित्र संस्था नागभीड च्या सदस्यांनी वणवा झाडाच्या फांद्यांनी,मातीने व वन्य विभागाकडे असलेल्या अग्नी विझवण्याच्या उपकर्णाच्या साहाय्याने वणवा नियंत्रणात आणला.,,,,!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close