ताज्या घडामोडी

चंद्रपूरात पेंशन संघर्ष यात्रेची बनणार वज्रमुठ

जास्तीत जास्त जुनी पेन्शन धारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री केदार यांनी केले आहे.

महाराष्ट्र जुनी हक्क पेन्शन संघटना चिमुर चे आवाहण

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

महाराष्ट्र सरकारने १नोव्हेबर २००५ आणी त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून पर्यायी डिसीपिएस एनपिएस योजना कर्मचा-यांचा मस्तकी मारली.नवी पेंशन योजनेचे स्वरूप फसवी आहे.त्यातुन वृद्धापकाळाचा आधार असलेला पेंशन निवृत्ती वेतन बंद केली.त्यामुळे वृद्धापकाळाचा आधार हिससकाऊन घेतला.

जुन्या पेंशनच्या मागणी साठी मुंबई येथुन पेंशन संघर्ष यात्रा निघाली आहे.हीच यात्रा ६ डिसेंबर ला चंद्रपुरात दाखल होत आहे.त्या दिवशी सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सभा होईल . त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष यात्रा धडकणार आहे. २००५ व त्या नंतरच्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु होण्यासाठी पेंशन धारकांची वज्रमुठ चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या संघर्ष यात्रेला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.या संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त पेंशन धारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटणा चिमुर कडुन अध्यक्ष जनार्दन केदार , जिल्हा उपाध्यक्ष माधव पिसे ,तालुका सचीव वैभव चौधरी, कार्याध्यक्ष सरोज चौधरी , कोषाध्यक्ष सचिन शेरकी ,महिला प्रमुख गजभे , राजेंद्र लोखंडे ,कांचण मेश्राम ,पावडे ,शरद नन्नावरे ,सचीन नेमाडे ,ठोंबरे ,मापारी , मुनघाटे,अतूल महाजन , मंगेश पिसे ,सोपाण देवतळे ,सूशील मसराम , सत्यपाल जाधव ,गोमासे , धिरज नन्नावरे व इतर यांनी केले आहे.

“””महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटणा चिमुर कडुन पेंशन संघर्ष यात्रेच्या आवाहनाला हाक देत शाळा , तहसिल कार्यालय,कृषी कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्प, वनविभाग , आरोग्य विभाग, महाविद्यालय, काॅलेज या ठिकाणी राज्य कर्मचारी यांना प्रत्यक्ष भेटी , मार्गदर्शन करूण
संघर्ष यात्रेला वज्रमुठ बांधत आहे.””

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close