ताज्या घडामोडी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आदर्श स्त्रीयांनी घ्यावा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली विधानसभा क्षेत्र तर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र आयोजित घर तिथे रांगोळी स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ गिताताई हिंगे यांच्या जिल्हा महिला आघाडी कार्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला खासदार अशोक नेते यांच्या उपस्थित व मान्यवरांसह सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बेटी बचाओ,बेटी पढाओ या योजनेअंतर्गत घर तिथे रांगोळी या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना खासदार अशोक नेते व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा गीता हिंगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून बेटी बचाव बेटी पढाव या थीम नुसार रांगोळी घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला
या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करतांना बेटी बचाओ बेटी पढाओ ही महत्वाकांक्षी योजना देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सन २०१५ साली मुलगी मुलगा भेदभाव न करता मुलींना समाजात समान दर्जा प्राप्त व्हावा या उद्देशाने योजना काढली, या योजनेचा उदेश्य लिंग निवड प्रक्रियेतील पक्षपात दूर करून मुलीचे अस्तित्व आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, मुलींचे शोषणापासून संरक्षण करणे आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही महत्वाकांशी योजना राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना बोललेले की, केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व पुरुषांना समान अधिकार तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबविलेला आहे.

महिलांनी घराबाहेर पडून घर कामासोबतच समाजकार्य राजकारणाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे
वरील कार्यक्रमात पाहिले बक्षीस 5000 रू.श्रद्धा भोयर यांना देण्यात आले द्वितीय बक्षीस 3000रू साधना भुरसे यांना देण्यात आले तृतीय बक्षीस 2000रू दीक्षा कोवे तर प्रोत्साहनपर बक्षीस सीमा कन्नमवार, सिया आसमवार, सोनाली कांबळे , संगीता राऊत , मंजुषा आंबटवार यांना देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रायोजक खासदार अशोकजी नेते होते.
कार्यक्रमाचे संचालन सीमा कन्नमवार यांनी केले.
या कार्यक्रमास लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,सचिव वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे ,माजी जी.प. सभापती रंजिता कोडापे, जिल्हा सचिव आरती सरोदे , सुनिता राऊत आलेवार, डोईजड ताई, अल्का पोहणकर, पुष्पा करकाडे, लक्ष्मी कलंत्री,लाटकर, भारती खोब्रागडे व असंख्य स्पर्धक तसेच भा ज पा पदाधिकारी उपस्थित होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close