ताज्या घडामोडी

जिंतूर मध्ये भरदिवसा घरात घुसून डॉक्टर महिलेवर चाकूने वार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

घरामध्ये कोणी नसताना भर दिवसा दोघाजणांनी घरात घुसून एका डॉक्टर महिलेवर चाकूने वार केल्याची घटना परभणीच्या जिंतूर शहरातील गणेश नगर येथे घडली आहे. डॉ. ज्योती सांगळे असे जखमी झालेले महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या जिंतूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
जिंतूर शहरातील गणेश नगर येथे डॉ गणेश सांगळे हे पत्नी डॉ. ज्योती सांगळे आणि मुलीसह राहतात आज सोमवार २५ जुलै रोजी डॉ ज्योती सांगळे या मुलीसह दुपारी घरामध्ये घर काम करत असताना दुपारी अचानक दोघेजण घरामध्ये शिरले. दोघातील एकाने लहान मुलीला चाकू दाखवला.
या सोबत डॉ ज्योती सांगळे यांना चाकू लावला त्यामुळे डॉ ज्योती सांगळे यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी डॉक्टर ज्योती सांगळे यांच्यावर वार करून घरामधून पळ काढला. चाकूने वार केल्याने डॉ. सांगळे यांच्या बोटाला दुखापत झाली आहे.
शेजाऱ्यांनी डॉक्टर सांगळे यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जिंतूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केली आहे. शेजाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र अज्ञात हल्लेखोर ने हल्ला का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close