कोल्हा येथील पशुवैद्यकीय अधिकारी अ. माजेद यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी
मानवत तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना कोल्हा येथील पशुवैद्यकीय अधिकारी अब्दुल माजेद व पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे कोथाळा येथील शेतकरी परशुराम पाते यांच्या वतीने पुष्पहार शाल देऊन सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे.मानवत तालुक्यातील कोथाळा येथील शेतकरी परशुराम पाते यांच्या दोन बैलांना विषबाधा झाली होती.व बैलाची परिस्थिती अतिशय चिंताजनक होती कोथाळा येथून शेतकरी परशुराम पाते यांनी आपल्या बैलांना घेऊन कोल्हा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक(1) येथे आले.व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अब्दुल माजेद व त्यांचे कर्मचाऱ्यांनी बैलांना वाचविण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले..दोन्ही बैलांचा जीव वाचला त्यामुळे शेतकरी परशुराम पाते यांचा मन भरून आला त्यांनी अब्दुल वैद्यकीय अधिकारी अब्दुल माजेद व कर्मचारी चा मनापासून आभार व्यक्त केला.तेवढेच नव्हे तर त्यांनी पुष्पहार शाल घालून सर्वांचे सत्कार सुद्धा केले यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक (1) पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अब्दुल माजेद, कर्मचारी भगवान डोके, शेख मुस्तफा,एल.एस.एस.शेख नयुम, राहुल देशमुख,प्रविन खराडे, शेतकरी बंधू उपसरपंच परशुराम पाते, गजानन पाते, अमोल लाडाने, कोंडीबा बावने,उपस्थित होते.