ताज्या घडामोडी

वीज तोडणी प्रकरणी मुख्यमंत्री निवासाबाहेर आंदोलनाचा आप राज्य संयोजक रंगा राचुरे यांचा इशारा

वचन पाढा- वीज तोडू नका, अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू: रंगा राचुरे

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

गेल्या वर्षभरात लॉकडाउन मुळे जनतेचा रोजगार हिरावला गेला होता. मुख्यत्वे घरगुती आणि लघु उद्योजक ग्राहकांना या लॉक डाउन चा फटका बसला असल्याने त्यांची वीज बिल थकबाकी आहे. त्यांच्या खिशात पैसे नसताना त्याची वीज कापणे म्हणजे सावकारीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करूनच ३० टक्के वीज सवलतीचे आश्वासन वचननाम्या द्वारे राज्यातील जनतेला दिले होते. मग आता शब्द न पाळता कनेक्शन कट करण्याची धमकी, यामागे कुणाचा दबाव आहे हे त्यांनी जनतेस सांगावे. सरकारने कोरोना संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे न राहता एप्रिलमध्ये विजदरवाढ केली गेली पण जनतेच्या दबावामुळे ऊर्जामंत्री यांनी दिवाळीच्या तोंडावर सवलतीची घोषणा केली आणि नंतर घुमजाव केले. त्यांनाही शब्द फिरवावा लागला. यामागे कोणत्या शक्ती आहेत हे त्यांनी जनतेला सांगावे.

दिल्लीत आप सरकार गेले काही वर्षे २०० युनिट वीज मोफत देते आहे. महाराष्ट्रात सरकारची भूमिका अडेलपणाची आहे. खरेतर सार्वजनिक दिवाबत्ती-पाणीपुरवठा व इतर शासकीय सेवांची वीजबिल थकबाकी मोठी आहे तसेच उच्चदाब व बेकायदेशीर वीज वापराचा/ गळतीचा बोजा पण मोठा आहे. ती रक्कम वसूल न करता सामान्य ग्राहकांच्या अंगावर तो बोजा टाकणे अयोग्य आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री परवाना शुल्कात ३६० कोटींची सवलत दिली आहे, दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाउन काळातील टोल वसुली झाली नाही म्हणून टोल कंत्राटदारांना भरपाई दिली आहे. ‘सरकारची ही धोरणे उफराटी आहेत व सामान्य जनतेच्या फसवणूक करणारी आहेत. त्यामुळे ज्या जनतेच्या खिशात पैसा नाही , त्या जनतेची वीज कापल्यास आप चे कार्यकर्ते पुन्हा वीज जोडणी करतील.
याउप्पर सरकारने ही वीज खंडित करण्याची जनविरोधी कृती चालू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलन करू असे आप चे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी म्हंटले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close