ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांसाठी गडीसुर्ला येथे सेंद्रिय डेमो युनिट उद्घाटन संपन्न

तालुका प्रतिनिधी :हेमंत बोरकर मुल

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प व सखी महिला ग्रामसंघ यांच्या द्वारे धरती स्थानिक सेंद्रिय गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 सप्टेंबर 2021 ला मौजा गडीसुर्ला येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सेंद्रिय डेमो युनिटचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री. मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. गायकवाड सर तालुका कृषी अधिकारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. तिजारे सर मंडळ कृषी अधिकारी, श्री. सुनिल कारडवार सर कृषी अधिकारी पंचायत समिती मुल, श्री. चौधरी सर कृषी अधिकारी पंचायत समिती मुल, श्री. पेठकर सर कृषी विस्तार अधिकारी, श्री. पाटील सर कृषी सहाय्यक, श्री. खोबरागडे ग्रामविकास अधिकारी, श्री. वाडके सरपंच गडीसुर्ला, सौ. सुवर्णा ताई आकानपल्लीवार तुलसी प्रभागसंघ अध्यक्ष उपस्थित होते.
श्री गायकवाड सर यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळवता येईल यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. कु. माया सुमटकर तालुका अभियान व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन करतांना शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्याने आज जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करू या यासाठी धरती स्थानिक गट गडीसुर्ला अंतर्गत प्रभागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा उदा. गांडूळ खत, कंपोस्ट खत, लेंडी खत, घनजीवामृत, अजोला, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, वेस्ट डी कंपोजर, दही अर्क, ब्रह्मास्त्र, अग्नीअस्त्र, उपलब्ध करून दिल्या जाईल असे मार्गदर्शन केले.
श्री चौधरी सर यांनी सेंद्रिय डेमो युनिट मध्ये उपलब्ध वस्तूंना कसा बाजारपेठ मिळवता येईल या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री पेठकर सर यांनी सेंद्रिय निविष्ठा या जागतिक स्तरावर कशाप्रकारे पोहोचता येईल उदा. ॲमेझॉन फ्लिपकार्ट यावर मार्गदर्शन केले.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल येथून मा. प्रकाश तुरनकर तालुका व्यवस्थापक, निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, स्नेहल मडावी तालुका समन्वयक (शेंद्रीय शेती), कु. जयश्री कामडी तालुका समन्वयक (फारवड लिंकेज) ,रुपेश आदे प्रभाग समन्वयक (सेंद्रिय शेती), अमर रंगारी प्रभाग समन्वयक, हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, श्री. सोपानकर कृषी व्यवस्थापक, श्री. मयूर गड्डमवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. दीक्षा मोहूर्ले कृतीसंगम सखी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सोनाली शेंडे बँकसखी तर उपस्थितांचे आभार सौ. हेमलता बुटले ग्रामसंघ लिपिका यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चंदा मोहुर्ले, सौ. मीना कावळे, सौ. तेजस्विनी शिंदे, सौ. सुमन येनुरकर,बनिलोफर शेख, सौ. सीमा आंबटकर, सौ. वैशाली आंबेडकर, सौ. मनीषा रापेलीवार व सखी महिला ग्रामसंघ सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close