मजरा (रै) येथे मैत्री महिला ग्राम संघाच्या वतीने महिला मेळावा संपन्न
अनेकाचा सत्कार तथा आर्थिक सहाय्य
प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील मजरा रै येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्न वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. स्वच्छता, आरोग्य, शासनाच्या विविध योजना, समाजातील वाईट चालीरिती, स्वयंम रोजगार, महिला सक्षमीकरण, महिलांचे कायदेविषयक अधिकार इत्यादी विषयांना हात घातला. यावेळी महिला बचत गटाच्या महिलांनी व उपस्थित श्रोत्यांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी प्रामुख्याने मंचावर एडवोकेट प्रिया पाटील, मजरा रै चे सरपंच राकेश बोढे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुचिता खोब्रागडे, ग्रामपंचायत चीनोरा मा.सरपंच सुशीला तेलमोरे, उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे अधिसेविका वंदना बरडे, ग्राम तंटामुक्त समिती मजरा रै अध्यक्ष सोमा नामेवार, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता सालोरी येन्सा ब्लॅक मजरा (लहान) ग्यानीवंत गेडाम, ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य मजरा (लहान) सारिका धाबेकर, ग्रामपंचायत मजरा रै चे ग्रामसेवक ढेंगळे सर, समुपदेशक वरोरा पोलीस स्टेशन योगिता लांडगे, छाया घोटे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मजरा रै, मंदा देवगडे, नंदा चांदेकर, आनंद ढोके, जांभुळे मॅडम, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या महिला मेळाव्याचे औचित्य साधून महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक मनस्वी टिपले, द्वितीय रोशना रामटेके तर तृतीय पुरस्काराच्या मानकरी शुभांगी केळझरकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना शाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच दिव्यांग व्यक्ती ला आर्थिक सहाय्य देऊन व नुकत्याच कमी वयात विधवा झालेल्या महिलांना साडीचोळी देऊन त्यांना मानाचे स्थान समाजात मिळावे याकरिता मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच मैत्री ग्राम संघाच्या अध्यक्ष व सचिव यांचा व गावातील सर्व बचत गटाच्या अध्यक्ष सचिवाना यावेळी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बचत गटातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना आपली कला सादर करण्यासाठी स्टेज मिळावा याकरिता मैत्री महिला ग्राम संघाच्या वतीने सांस्कृतिक डान्सं कार्यक्रमाचे आयोजन केले होते व ते उत्कृष्टपणे पार पडले. यावेळेस अनेक महिलांनी आपले सदाबहार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच राकेश बोडे यांनी केले. तर उत्कृष्ट सूत्रसंचालन चेतना माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका वनिता ढवस यांनी केले. कार्यक्रमाला गावातील तथा परिसरातील अनेक बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.