ताज्या घडामोडी

अमरपुरी भान्सुली येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात बैल व म्हैस ठार

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

चिमुर तालुक्यातील अमरपुरी भान्सुली येथील शेतकरी शामराव रामटेके यांचा बैल त्यांच्या शेतालगत चरत असतांना सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास पट्टेदार वाघाने हमला करुण बैलाला ठार केले त्याच वाघाने दिवाकर श्रीरामे यांची पण म्हैस ठार केली हे दोन्ही शेतकरी वनविभागाकडून आर्थिक मदतीची मागानी करीत आहेत.

वाघाच्या हल्ल्यामुळे येथिल शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. गावातील शेतकऱ्यांच्या म्हणन्या नुसार १०ते १२ दिवसापासुन त्या परिसरात वाघाचा वावर आहे . शेतकऱ्यांना अहोरात्री जिव धोक्यात घेऊन शेतात जावे लागते म्हणुन शेतकऱ्यांच्या मनातील भिती निघन्यासाठी व कोणत्याही शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण राहणार नाही यासाठी वनविभागाला वाघाचा बंदोबस्त करन्यासाठी शेतकऱ्यांकडून विंनती करण्यात आली आहे अमरपुरी भान्सुली परिसरात वाघाचा वावर वाढल्याने ग्रामवाशींयातर्फे सुद्धा वनविभागाला विनंती करण्यात आली आहे पुढील तपास वनरक्षक करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close