वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुरूषोत्तम बोपचे परिवाराची आ.किशोर जोरगेवारांनी घेतली भेट

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्थानिक इंदिरा नगर येथील रहिवाशी पुरुषोत्तम चिंतामन बोपचे यांच्या कुंटुबियांची आज सोमवार दि.१मे ला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली. मृतकच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सुचना त्यांनी या वेळी केल्या आहे. सोबतच या भागात मुक्तसंचार असलेल्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. सदरहु मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना पाठविले आहे.
इंदिरा नगर येथील रहिवासी पूरुषोत्तम चिंतामन बोपचे हे सकाळच्या सुमारास कुड्याचे फुल वेचण्यासाठी एमईएल लगतच्या जंगलात गेले होते. सायंकाळ पर्यंत ते घरी परत न आल्याने घरच्यांनी जंगलात त्यांचा शोधाशोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळुन आला होता. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान आज सोमवारला आमदार जोरगेवार यांनी मृतक यांच्या इंदिरा नगर येथील निवासस्थानी जात त्यांचे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मृतकाच्या पत्नीला वन विभागाने कंत्राटी पध्दतीवर नोकरीत सामावून घेण्याच्या सूचना त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे. या भेटी दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आनंद रणशूर, नितेश गवळी, डॉ. गरिधर येडे, पप्पु बोपचे, तुषार येरमे, संजय पटले, सोनू मडावी, पंकज चटप, आदींची उपस्थिती होती.
▪️◻️दीड महिण्यातील ही दुसरी घटना असुन यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यु झाला आहे. येथे नागरीवस्ती आहे. अशातच नरभक्षक वाघाचा येथे मुक्त संचार असने ही गंभीर बाब आहे. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, या नरभक्ष वाघाचा शोध घेत त्याला जेरबंद करावे अशी मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी केली आहे. सदरहू मागणीचे निवेदन आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना नुकतेच पाठविले आहे.