इसाद येथे आ.गुट्टे यांच्या हस्ते दत्त मूर्तीची स्थापना
श्रीदत्त संस्थान ईसाद सभामंडप विकास कामासाठी दिला दहा लक्ष रुपयांचा निधी.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी
दिनांक १८ जुलै रविवार रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद गावी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे , महंत मंडळीच्या हस्ते व भाविक भक्तांच्या उपस्थित दत्त मूर्तीची स्थापना करण्यात आली.
मौजे ईसाद ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पुरातन श्रीदत्त मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन सुंदर व भव्य मंदिराचे बांधकाम केले आहे. आज साध्य योगावर श्री रखमाजी भोसले यांनी देणगी स्वरूपात दिलेली श्री दत्ताची मूर्ती व जुन्या मंदिराच्या गाभाऱ्यातील श्री ची महादेव पिंडीच्या स्वरूपातील जुनी मूर्तीची स्थापना नवीन मंदिरातील गाभाऱ्यात करण्यात आली. आज भल्या पहाटे पासून श्री दत्तात्रेय मूर्तीचा अभिषेक करून त्यानंतर होम हवन व विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरा समोर सभामंडप बांधकाम करण्याकरिता गावकऱ्यांनी आ. गुट्टे त्यांच्याकडे निधीची मागणी केली असता आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत सभामंडप बांधकामाकरिता आमदार स्थानिक विकास निधी मधून दहा लक्ष रुपयांच्या विकास कामांचे पत्र दिले. “माझे वडील दत्तात्रेयांचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी अनेक वर्षे माहूरची वारी केली. माझी सुद्धा श्री दत्ता वर भक्ती असल्याने इसाद येथील दत्त संस्थानाच्या विकास कामाकरिता मी गावकऱ्यांच्या सदैव सोबत असल्याचे” आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या प्रसंगी आमदार गुट्टे यांना दत्तात्रेयांचे भजन गायनाचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही भक्तजनांच्या समोर दत्तात्रेयांची आराधना केली.
मूर्ती स्थापनेसाठी माहूर संस्थानाचे मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज, दत्तबर्डी संस्थानाचे महंत गोपाळगीर महाराज, कोलंबी संस्थानाचे मधुबन महाराज, ईश्वरबन महाराज, सिद्धगिरी संस्थानाचे दयाळगीर महाराज, उस्मान नगर संस्थानाचे महंत अवधूतबन महाराज, माहूर संस्थानाचे महंत विजयबन महाराज, महंत भगवान महाराज, ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर व श्रीदत्त संस्थान इसाद चे मठाधिपती महंत शंकरबन महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती तर गावचे जि.प.सदस्य किशनराव भोसले,सरपंच उद्धव सातपुते, उपसरपंच नितीन भोसले, भगवानराव सातपुते, दिगंबरराव भोसले गोपीनाथराव भोसले, हनुमंत मुंडे राजेभाऊ बापू सातपुते, यांच्यासह इसाद व पंचक्रोशीतील भक्तमंडळी उपस्थित होती. मंदिर बांधकाम व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भोजराव नाना सातपुते, रामप्रसाद सातपुते, बालाजी कवडे, ज्ञानोबा पांचाळ, सतीश भोसले ठेकेदार, पांडुरंग भोसले सर इत्यादींनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना रामप्रसाद सातपुते तर सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी केले.