आयटीआय मध्ये चोरी

आरोपी गजाआड
मुख्य संपादक : समिधा भैसारे
चिमुर: – पोलीस स्टेशन हद्दितील स्वामी विवेकानंद आयटीआय येथे ४ व ५ तारखे दरम्यान आयटीआय मध्ये रात्रौ आत प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी संगणक , प्रिंटर व इतर साहित्य अदांजे किंमत रु .५२०००चा मुद्देमाल चोरी केला फिर्यादी कुंदन तपासे यांनी रिपोर्ट दिली पोलीस स्टेशन चिमुर चे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी आपली गोपनीय यंत्रणा वापरून आरोपी सौरभ मनोहर चांदेकर वय २0 वर्ष , प्रतिक ताराचंद मत्ते वय २१ वर्ष व स्वप्नील रामकृष्ण बंडे वय २३ वर्ष सर्व राहणार चिमुर यांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता तिन्ही आरोपीनी चोरी केल्याची कबुली केली त्यांच्या ताब्यातुन चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदर कारवाही मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो . हवालदार विलास निमगडे , सचिन खामनकर , सचिन गजभिये , विनायक सरकुंडे , सतीश झिलपे यांनी पार पाडली