क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालोरी येन्सा ब्लॉक मजरा(लहान) येथे गावकऱ्यांनी स्वफुर्तीने राबविले स्वच्छता अभियान


तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील सालोरी येंन्सा ब्लॉक मजरा येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावकऱ्यांनी ज्योतिराव फुले यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. सर्वप्रथम गावातील अंतर्गत रस्ते यांची झाडलोट करून अनावश्यक गवत कचरा काढून टाकण्यात आले. गावातील कचरा कुंड्या साफ करण्यात आल्या. शाळा परिसर,ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच सर्व गावातील अंतर्गत रस्ते व नाल्याची साफसफाई करण्यात आली. ग्रामपंचायत व गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने स्वच्छता अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवित गाव स्वच्छ करण्यास आपला पाठिंबा दर्शवून अभिमानास्पद असे कार्य केले.

यावेळी प्रामुख्याने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची व शेकडो महिला, पुरुष व आबालवृद्ध यांची ग्रामस्वच्छता अभियानात प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून महात्मा ज्योतिराव फुले यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.