ताज्या घडामोडी
वैनगंगा नदीच्या पुलावर मिनी ट्रक च्या धडकेत युवक जागीच ठार
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर मिनी ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात गोंडपीपरी तालुक्यातील तारसा (खुर्द)येथील युवक संतोष भुरू कुलमेथे वय 24 वर्ष हा जागीच ठार झाल्याची घटना आज दि.5 डिसेंबर रोज रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आष्टी -गोंडपीपरी मार्गावर वैनगंगा नदी पुलावर घटना घडली.
घटनेची माहिती आष्टी पोलिसाना होताच ते घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.
आष्टी कडून गोंडपीपरी मार्गे चंद्रपूर कडे जाणारी मिनी ट्रक क्रमांक AP 15 Y 2148 या मिनी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकीस्वार संतोष भुरू कुळमेठे रा.तारसा (खुर्द) हा जागीच ठार झाला.गावातील तरुण व मनमिळावू स्वभावाचा युवक गेल्याने तारसा गावात हळहळ व्यक्त होत आहे.