ताज्या घडामोडी

रा.प.म. कर्मचाऱ्यांच्या आलंदोलनाला चिमूर तालूका ऑल इंडीया पँन्थ्थर सेनेचा पाठींबा

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

राज्य परीवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित मागण्या जसे रा.प.म.महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलनिकरणात करणे, रा.प.म.महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थ संकल्पात समाविष्ठ करणे, एस.टी. कामगारांना समान काम समान दाम यातत्वार किमान वेतन कायद्यानूसार १ एप्रिल २०१६ पासून १८००० / रूपये मुळ वेतन मिळणे बाबत आणि सातव्या वेतन आयोगानुसार रा.प.म. कर्मचाऱ्यांना सेवा श्रेष्ठतेनूसार श्रेणी लागू करणे इत्यादी रास्त मागण्या शासनाने मंजूर कराव्या या करीता रा.प.म. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास ऑल इंडीया पॅन्थ्थर सेनेचा जाहीर पाठींबा आहे .

आम्ही आपल्या सोबत आहोत असे पत्र ऑल इंडीया पॅन्थ्थर सेनेचे तालुका अध्यक्ष आशीष बोरकर , उपाध्यक्ष वामन गेडाम , सचिव मनोज सरदार , सहसचिव नाजुक मेश्राम , संघटक अरुण मेश्राम , सदस्य प्रकाश भानारकर , रमेश गेडाम , भागवत बोरकर , प्रदीप मेश्राम , अखिल वासनिक , संजय खोब्रागडे व महेश पाटील यांनी दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close