गोंडपीपरी बाजारातील विजेचा खांब ठरली शोभेची वास्तू

तीन वर्षे लोटूनही वीजेच्या प्रतीक्षेत व्यापारी
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
नगरपंचायत गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या शहरातील बाजाराच्या ठिकाणी मागील तीन वर्ष्याआधी उभारलेला सौरउर्जावर चालणारा विजेचा खांब अद्यापही सुरू झाला नसल्याने नगरपंचायत च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गोंडपीपरी शहरात दर रवीवारला आठवडी बाजार भरतो. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा खांब, चिकन-मटण मार्केट शेड, घनव्यवस्थपन केंद्र, पाण्याची टाकी उभारली आहे.
मात्र बाजाराच्या ठिकानी अजून वीज पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने ग्राहक-व्यापारी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे
विशेषतः सायंकाळच्या सुमारास येथील बाजारात ग्राहकांची अफाट गर्दी असते.
शहरा पासून तर खेड्यापाड्यातील,चंद्रपूर, बल्लारशाह येथील तसेच तालुक्यातील व्यापारी या बाजारात आपआपली दुकाने लावतात. खेड्यापाड्यातील ग्राहक सुद्धा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात
सांयकाळच्या सुमारास अंधारात व्यापारी – आणि ग्राहक यांना पैशाची देवाण-घेवाण करताना आणि बाजार उठण्याच्या वेळी सामानाची आवरा आवर करताना विजेची सोय नसल्याने व्यापाऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो .
त्यामुळे मागील तीन वर्ष्याआधी बाजाराच्या मधोमध सौर ऊर्जेवर चालणार विजेचा खांब उभा उभारण्यात आला मात्र तीन वर्षे लोटूनही अद्यापही बाजाराच्या ठिकाणी वीज पुरवठा सुरू झाला नसल्याने नगरपंचायत च्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापारी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी त्वरित बाजारात वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी व्यापारी व ग्राहक करीत आहेत.