वरोरा विद्युत कार्यालयात नागरिकांचा धुमाकूळ

गावातील लाईन सुरू करा अन्यथा तुमच्या कार्यालयास कुलूप लावून आंदोलन करू छोटू भाई शेख व राजू भाऊ बन्सोड यांचा इशारा
ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी संघर्ष समितीमार्फत देशव्यापी संप म्हणून काम बंद करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वरोरा शहरात संपूर्ण गावांमधील लाईन कापून सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे त्यात वर्ग दहावी बारावीची परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास त्रास होत होता घरी असलेली लहान बाळ यांना घरची लाईन नसल्याने त्रास होत असल्याने महावितरण डिव्हिजन ऑफिस वरोरा या ठिकाणी जाऊन कम्प्लेंट देण्यात आली त्या ठिकाणी छोटू भाई शेख यांनी ऑफिसच्या कार्यकारी अभियंता यांना फोन लावला त्यांचा नंबर बंद असल्याने त्या ठिकाणी ऑफिस बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केलं की गावातली लाईन बंद असल्यामुळे त्याठिकाणी सक्षम अधिकारी साहेब उपस्थित नाही साहेब वरून त्यांचा फोन बंद आहेत त्यांना या ठिकाणी बोलावं साहेबांना माहिती मिळयाबरोबर ताबडतोब ऑफिसला पोहोचले आणि छोटूभाई शेख यांच्याशी चर्चा केली छोटू भाई यांनी त्यांना सांगितले की ,विद्युत कर्मचारी त्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्यांनी त्यांनी गावातील भरपूर जाग्यावर चे लाईन कापून ठेवल्या आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप त्रास होत आहे तुम्ही ताबडतोब संपूर्ण लाईन सुरू करावे आणि जे कृत्य केल्या त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा अशी भूमिका वरोरा विद्युत कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्यासमोर मांडली या ठिकाणी छोटू भाई शेख, राजूभाऊ बनसोड, अजय लेदे, राजू सहारे, नौशाद शेख, आलेख रट्टे उपस्थिती होते.
वरोरा शहरातील संपूर्ण नागरिकांना आव्हान आहे की आपल्या घराजवड विद्युत डीपी असल्याने यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवून कोणत्याही प्रकारचे विद्युत कर्मचारी येऊन संबंधित डीपी वरील लाईन बंद करू शकतात असे घडल्यास ताबडतोब विद्युत कार्यालयात संपर्क साधावा.