ताज्या घडामोडी

सततच्या पावसामुळे घर पडले

उप संपादक:विशाल इन्दोरकर

चिमुर तालुक्यातील नेरी येथील महेन्द्र सेंदरे (सेंदुरकर ) यांचे घर पावसामुळे पुर्णपणे पडले आहे .
जुलै महिन्यात झालेल्या सतत पावसामुळे महेन्द्र सेन्दरे यांचे घर मोडकळीस येऊन पडल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

सविस्तर असे की, नेरी येथील पेठ विभागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला तलावाच्या पोटात लागून यांचे वडिलोपार्जित घर होते. तिथे महेंद्र सेंदरे वय जवळपास ४५वर्षे व त्यांची वृद्ध आई यांचा वास्तव्य होता. काही दिवसांपूर्वी रात्री पाऊस सुरू असताना अचानक घराचा मागचा अर्धा भाग पावसामुळे कोसळला व दोघेही झोपेतून जागे होऊन भीतीदायक वातावरणात घराबाहेर रस्त्यावर आले. पुन्हा घर पडण्याच्या भीतीमुळे ती रात्र दोघांनी रस्त्यावरच जागून काढली. नन्तर जी समोरची छोटीसी बैठक खोली बाकी होती त्यात त्यांनी काही दिवस काढले. पण ५ तारखेच्या रात्रीच्या पावसामुळे ती सुद्धा पुर्ण पडली व त्यांना रात्रीच दुसरी कडे आश्रय घ्यावा लागला. आता त्यांच्या समोर राहण्याचा प्रश्न निर्मान झाला आहे. जेव्हा घर पुर्ण जिर्ण अवस्थेत झाला असता त्यांनी घरकुल योजनेसाठी २०१९ मध्ये अर्ज केले होते पण त्यांना कोनत्याही योजनेचे लाभ अजुन मिळाले नसुन आत्ता त्यांनी घर पडल्याची ग्रा. प. नेरी तथा तलाठी कार्यालयात नोंद केली. मोका चौकशी करुनही अजुन पर्यंत त्यांना कोनतेही लाभ मिळालेले नाही तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना योग्य ती मदत करावी अशी मागनी महेन्द्र शेंदरे करीत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close