अधिकारी वर्गांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहचवावे. खासदार अशोक नेते
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
ब्रम्हपुरी विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आढावा बैठक तहसील कार्यालय सभागृह ब्रम्हपुरी येथे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थित प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची विविध महत्वपूर्ण विषयासंदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या संबंधी व घरकुलासंबंधी,ब्रम्हपुरी नगरपरिषद,सिंचाई, कृषी, यावर सविस्तर चर्चा करून आढावा घेत मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यात यावा. मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नव वर्षाच्या काळात अनेक योजना कार्यान्वित केल्या.त्या थेट योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहचवावा. यात अधिकारी वर्गांनी जनतेला लाभ देण्यात कुठल्याही प्रकारची टाळाटाळ न करता शासनाच्या योजने पासून कोणताही व्यक्ती किंवा पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशी सूचना खासदार अशोकजी नेते यांनी केल्या.
याप्रसंगी कृषी अधिकारी,आरोग्य अधिकारी, वनविभाग अधिकारी,पोलीस विभाग,बँक अधिकारी, महसुल विभाग, पाणी पुरवठा, सिंचाई,नगरपरिषद असे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.
या बैठकीला प्रामुख्याने खासदार अशोकजी नेते यांच्यासह प्रा. अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा, प्रा.प्रकाशजी बगमारे ओबीसी प्रदेश चिटणीस,किशोर घाडगे अति.जिल्हाधिकारी, तहसीलदार उषा चौधरी मॅडम, उपविभागीय अधिकारी(SDM) संदीप भस्के,दिनकर ठोसरे एसडीपीओ, प्रियस महाजन साहेब,तसेच विविध विभागाचे अधिकारी वर्ग, पदाधिकारी उपस्थितीत होते.