नेरी तंटा मुक्त समितीने लावला स्वजातीय प्रेमीयुगुलाचा विवाह

प्रतिनिधी: रामचंद्र कामडी
चिमुर तालुक्यातील नेरी येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीने दि २६ आगष्ट २०२३ला ग्रामपंचायत चे आवारात एका स्वजातीय प्रेमीयुगलाचा विवाह लावून देण्यात आल्याने नेरी तंटामुक्त समिती पुढाकार घेत आज कालच्या युवक युवतींचे कमी खर्चात लग्न लावून देत असल्यामुळे या परिसरात अग्रेसर ठरत आहे .
मुलगी कु.मिनाक्षी सुधाकर शेंडे जात भोई मु.नवरगाव ता सिंदेवाही जि.चंद्रपुर वय १८ वर्ष पूर्ण काही महिने
मुलगा आकाश उपासराव पोईनकर जात भोई (ढिवर)वय वर्षं २६ मु.नेरी ता. चिमुर जी.चंद्रपुर
या दोघांचे दोन वर्षापासून प्रेमसंबध सुरू होते
विशेष म्हणजे मुलाची मेहुणी होत असल्याने त्यांच्यात प्रेम संबंध अधिकच द्रुढ होत गेल्याने
दोघां उभयतांनी लग्नाच्या आणाभाका घेत विवाह बंधनात अडकण्याचा व साथ जिऐंगे साथ मरेंगे असा सारासार विचार करून बेत आखला मात्र याला मुलीच्या घरच्यां मंडळींनी विरोध केल्याने या दोघा उभयतांनी नेरी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीकडे आज दि.२६ आगष्ट रोजी रितसर अर्ज सादर केला आणि विवाह लावुन देण्यासाठी विनंती केली
तंमुस समितीने रितसर अर्जाची तपासणी करून वया संबधी शालेय कागदपत्रे तपासून घेवुन समिती अध्यक्षा़चे पुर्व परवानगीने व सर्व समिती सदस्यांच्या पुढाकारातून आज रोजी हे लग्न लावुन देण्यात आले आणि प्रेमी युगुलांना विवाहबद्ध करण्यात आले
हिंदु पद्धतीनुसार ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी घनश्याम भाऊ लोथे यांनी उत्कृष्ट गळ्यामध्ये मंगलाष्टके गावुन हा विवाह लावून देण्यात आला
या विवाहप्रसंगी तंमुस अध्यक्ष हरिदासजी चांदेकर
सरपंच सौ.रेखाताई नानाजी पिसे,
समिती सदस्य पिंटु खाटीक, रूस्तमखाँ पठाण,चंद्रभान कामडी उपसरपंच, सौ.गंगाबाई विठ्ठल कामडी,सौ.सत्यभामा नारायण कामडी,सौ.संगीता यशवंत वैरागडे,संजय नागदेवते पत्रकार, रामचंद्र कामडी सर, पंकज पाकमोडे, मोरेश्वर श्रीरामे,कन्हैया सिंग भौंड,राजु उपासराव पोईनकर , प्रमोद मधुकर सामुसाकडे, शंकरराव पिसे माजी पोलीस पाटील,आणि ग्रा प कर्मचारी व तंमुस पदाधिकारी सदस्य गण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी उभयतांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा प्रदान केल्या.