ताज्या घडामोडी

खेर्डा महादेव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिनानिमित्त मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 26 जानेवारी 2023 ते 2 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान खेर्डा महादेव येथे प्रसिद्ध भारुडकर श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी श्री ह भ प पांडुरंग महाराज उगले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवर्य महामंडलेश्वर हरीश चैतन्य महाराज १००८ यांच्या मार्गदर्शनात व श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर चे मुख्य प्रवर्तक संस्थापक सदस्य तथा कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभानजी सांगडे साहेब यांचे शुभ हस्ते श्रीफळ फोडून व श्री प्रताप आमले यांचे शुभ हस्ते सपत्नीक ग्रंथ पूजा करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला होता


दिनांक 1फेब्रुवारी 2023 रोजी श्रीमद् भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व पंचमवेद गाथा पारायणाची सांगता झाल्यानंतर तीनही ग्रंथाचे विधिवत पूजन करण्यात आले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा श्रीमद् भागवत महापुराण या तीनही ग्रंथांच्या पूजेचे यजमान श्री प्रताप आम्ले सपत्नीक होते.
दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी श्री ह भ प पांडुरंग महाराज उगले यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक श्री त्रिंबक महाराज आम्ले यांचे शुभ हस्ते महाआरती व त्यांचे वतीने महाप्रसाद झाला. सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात गावातील तरुण श्री भरत आम्ले यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यसनमुक्तीचा संकल्प केला व नाना महाराज पळशीकर यांचे शुभ हस्ते तुळशी माळ गळ्यात धारण करून व्यसनमुक्तीचा संकल्प करून जीवनात परिवर्तन घडवून आणले.
सदर कार्यक्रमात पुढील प्रमाणे नामांकित महाराजांची कीर्तने झाली.
प्रथम किर्तन पुष्प श्री ह भ प अर्जुन महाराज पळशीकर यांनी गुंफले, तसेच श्री ह भ प प सुमंत महाराज डाके, श्री ह भ प राजाराम महाराज सूर्यवंशी, श्री ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर, श्री ह भ प योगेश महाराज गायके, श्री ह भ प सारंगधर महाराज रोडगे, श्री ह भ प नाना महाराज रत्नपारखी यांची कीर्तने झाली.
सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री नारायणराव आम्ले, बाबासाहेब आम्ले व त्रिंबक आमले यांच्या वतीने सर्व गुणी जणांचे व सर्व उपस्थित भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अशी माहिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री दीपक आम्ले यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close