ताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्हयातील वनजमिनीवर अतिक्रमण धारकांना वनपट्टे उपलब्ध करून दया

जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनातून मागणी..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली, १२ ऑक्टोबर :- जिल्हा हा अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्हयात अनेक वर्षापासून वन जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधून तथा शेतीविषयक व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना शेतिशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसून यांच्या कुटुंबाचे एकमात्र साधन शेती आहे. अनेक वर्षापासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत. मात्र त्यांना अदयापही वन पट्टे वितरीत करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हयातील वनजमिनीवर अतिक्रमण धारकांना वनपट्टे उपलब्ध करून दयावे अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हा आदिवसी बहुल, नक्षलग्रस्त असल्याने जिल्हयातील नागरिकांचा शेतीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालत असून शेती हा एकमात्र साधन आहे. जिल्हयामध्ये अनेक वर्षापासून वन जमीनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत त्यांना वन पट्टे वितरित करण्यात आलेले नाही तर काहींना वनपट्टे वाटप करण्यात आले आहे. परंतु आजतागायत त्यांना वैयक्तीक सातबारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे संबधितांना धान विक्रीह करतांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्हयातील नागरिकांना वनपट्टे व सातबारा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनातून केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close