राज्य विज्ञान प्रदर्शनात लोकेश चौरेवार प्रंथम
प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
राज्य विज्ञान संस्था, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्य विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी जि.सिधुंदुर्ग येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्या लयाचे नावाजलेले शिक्षक लोकेश चौरेवार यांनी शिक्षक गटातून राज्यात प्रंथम क्रमांक पटकाविला असून त्यांनी आपला व शाळेचा नाव लौकीक केला असून . त्यांनी संडे फार सायन्स प्रतिकॄती साठी प्रंथम क्रमांकाचे पारितोषिक शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आँनलाईन स्वरूपात देण्यात आले.असून या पुर्वी पण त्यानी चाळीसगाव येथून सुध्दा राज्यातून प्रंथम क्रमांक पटकावून पारितोषिक पटकाविले होते.
बालभारतीचे संचालक कॄष्णकुमार पाटील, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी, राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ राधा अतकरी, महेश पालकर , रविंद्र भास्कर,राजु नेब , इत्यादी मान्यवराचे हस्ते रोख, पुरस्कार, प्रमाण पत्र, आणि समॄती चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी मंहेद्र गजभिये,डायटचे प्राचार्य रमेश राऊत, विज्ञान प्रर्यवेक्षक रोकडे, गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी, विस्तार अधिकारी दिलीप साकुरे,ए.एस.बरकर.संस्थाध्यक्ष रमेशचंद्र झरारीया, उपाध्यक्ष संजीव कोलते, सचिव उमाशंकर हारोडे, प्राचार्य विकास बारा पात्रे, उपप्राचार्य सीमा भाजीपाले, प्रर्यवेक्षक टिकाराम पटले, यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व त्यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले.