” एक संवाद विद्यार्थीनींशी ” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 06/02/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी सर यांच्या संकल्पनेतून ” एक संवाद विद्यार्थीनींशी ” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय, सागर कॉलणी, पाथरी येथे आयोजित करण्यात आला

सदरील व्याख्यानाच्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक लांडगे सर सोबत सपोनि स्वामी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मिलिंद पोंक्षे (संस्थापक जाणिव चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्याथीनींना मौलिक मार्गदर्शन केले. त्यामध्ये मुलीना गुड टच बॅड टच, मुलीचे सुरक्षे विषयी, करीयर विषयी , मार्गदर्शन केले तसेच पोनि श्री लांडगे यांनी डायल 112 , पोस्को कायदा , विषयी माहीती दिली सदर कार्यक्रमास निर्भया पथक परभणी येथील १) करुणा मालसमिंदर (निर्भया पथक) २) शालिनी पवार (निर्भया पथक), ३) वंदना निरस (निर्भया पथक पोलीस स्टेशन पाथरी ) पोशि /1539 जैस्वाल यांची उपस्थिती होते.