ताज्या घडामोडी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने संविधान दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.26/11/2021 रोजी पाथरी येथे भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ठिक सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या व प्रदेश अध्यक्ष मा.राणी ताई स्वामी मा.अमोल सर अँड विजय पवार सर मराठवाडा अध्यक्ष श्री.मा. पंडित तिडके सर मा.सुनिता ताई कसबे जनहित न्युज चायनलच्य पत्रकार व इतर सर्व वरीष्ठाच्या मार्गदर्शना खाली परभणी व पाथरी विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला अभिवादन करत असतांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे व पाथरी तालुका अध्यक्ष सौ.सुमनबाई वामन साळवे हया दिसत आहेत उपधयक्षा सुशिलाबाई मनेरे आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्री.मा शिवराज कांबळे व इतर सर्वांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close