बोरी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शम्मु पटेल तर कार्याध्यक्षपदी अभिजित चौधरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बोरी येथील मराठी पत्रकार संघाची निवड प्रक्रिया बुधवार १५ डिसेंबर रोजी संपन्न झाली.
संघाच्या अध्यक्षपदी शम्मु पटेल तर कार्याध्यक्षपदी अभिजित चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष तुकाराम सर्जे होते निर्वाचन अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार एम. ए माजीद आणि शेख शकील होते
तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, ज्येष्ठ पत्रकार दीपक राजूरकर, नेमीनाथ जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
उर्वरित कार्यकारणी मध्ये सचिवपदी संतोष लहाने,उपाध्यक्ष बंडू राऊत, कोषाध्यक्ष भास्करराव चौधरी, सहसचिव शेख नईमोद्दीन तर कार्यकारणी सदस्यपदी मो.या.शेख, गणेश ठाकूर, वैभव सोळंके,शेख मोबीन,नामदेव कावळे,शेख असलम शेख नदीम, रामकिशन गरगडे, शेख हनीफ मार्गदर्शक म्हणून दीपक राजूरकर नेमिनाथ जैन,इंजि. नारायण चौधरी सल्लागारपदी गजानन चौधरी मारोती गायकवाड,तुकाराम सर्जे, रामा ढाकरगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोरी व बोरी परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोरी येथील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शम्मु पटेल, कार्याध्यक्षपदी अभिजीत चौधरी तसेच उर्वरित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याप्रसंगी एम.ए माजीद, शेख शकील, गजानन चौधरी, दीपक राजूरकर, नेमिनाथ जैन व इतर दिसत आहेत.