आ.धर्मराव बाबा आत्राम दिलेले शब्द करीत आहेत पूर्ण

सिरोंचा रोडचे काम प्रगतीपथावर
भामरागड येथील रस्ता गुळगुळीत झाले
एटापल्ली येथील रोडचे काम युद्धपातळीवर
आ.धर्मराव बाबा आत्राम रोडच्या कामासाठी ‘ऍक्टिव्ह मोडवर’
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, निवडून आल्यानंतर मतदार संघातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचा संकल्प बोलून दाखविले होते, दरम्यानच्या काळात कोरोना महामारी आली. त्यामुळे थोडं दिरंगाई झाले असले तरी, दिलेला शब्द पूर्ण करण्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम खरे उतरत आहेत.
आलापल्ली ते भामरागड येथील रस्ता गुळगुळीत झाले असून एटापल्ली येथील रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील रेपनपल्ली ते सिरोंचा रोडच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे, गत 5 ऑक्टोबर रोजी दस्तुरखुद्द आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नारळ फोडून कामाला शुभारंभ करायला लावले, सध्या खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होत असल्याचे दिसत असून वनविभागाचे तोडगा कायमस्वरूपी निघाल्यानंतर आलापल्ली ते रेपनपल्ली मार्गाचे नूतनीकरण होणार आहे, त्यासाठी बऱ्याचदा केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची प्रत्यक्षात भेटी घेऊन रस्त्यांचे कामाचे विषय लावून धरले, वनविभागाची तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वनखात्याचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लवकरच भेट घेऊन मार्ग मोकळा करण्याच्या ऍक्टिव्ह मोडवर आहेत.