ताज्या घडामोडी

शिवसेना पक्षातर्फे ‘जन सेवा हीच ईश्वर सेवा ‘ अंतर्गत आरोग्य शिबीर आंबोली येथे शेकडो नागरीकांनी घेतला आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचा लाभ

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमूर

शिवसेना पक्षातर्फे शिवसेना जिल्हा चंद्रपूर व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमानाने शिवसेना पक्ष आंबोली प.स. विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात आंबोली ग्रामपंचायतीच्या मदतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर डॉ. ए .पी जे अब्दूल कमाल वाचनालय आंबोली येथे सम्पन झाले .


शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य श्री नीतिनभाऊ मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख श्री मुकेशभाऊ जीवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख श्री अमृतभाऊ नखाते, व विधानसभा समन्वयक श्री भाऊरावभाऊ ठोम्बरे यांचे मार्गदर्शनात शिवसेना चिमूर तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जनसेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर ग्राम पंचायत आम्बोली येथील वाचनालयात संम्पन झाले, शिबिराचे उद्घाटन ग्राम पंचायत सरपंचा शालिनी दोहतरे, यांचे हस्ते शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, आंबोली प.स. विभाग प्रमुख राजेंद्र जाधव , उपसरपंच वैभव ठाकरे ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे यांचे उपस्थित सम्पन झाले, शिविरात 160 नागरिकानी तपासणी केली,
कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांचे नेतृत्वात डॉ, तेजस ठोम्बरे, डॉ, एकनाथ शिंदे, नाना नंदनवार, जयश्री राजनकर, भाऊराव गोहने यानी अथक परिश्रम घेतले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close